मधुचंद्राची रात्र संस्मरणीय ठरावी, अशी इच्छा आहे का? जाणून घ्या ५ सोप्या सेक्स टिप्स
लग्नानंतरची पहिली रात्र संस्मरणीय ठरावी, यासाठी आपण या लेखाद्वारे पाच सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत. याद्वारे तुमची मधुचंद्राची रात्र जबरदस्त होण्यास मदत मिळू शकते.
नव विवाहित जोडपे हनिमूनद्दल नेहमीच उत्साही असण्यासह चिंताग्रस्त देखील होतात. विशेषतः लग्नानंतर दोन व्यक्तींमध्ये निर्माण होणारे लैंगिक संबंध अशा लोकांसाठी अधिक आव्हानात्मक ठरतात, जे आयुष्यात पहिल्यांदाच सेक्सचा अनुभव घेणार असतात. पण चिंता करू नका. लग्नानंतरची पहिली रात्र संस्मरणीय ठरवण्यासाठी या लेखाद्वारे पाच सोप्या टिप्स जाणून घेऊया…
1) सेक्सी कपडे परिधान करा
पतीला आपल्या मादक अदांनी घायाळ करण्यासाठी सुंदर आणि सेक्सी कपडे परिधान करा. तुमचे सेक्सी कपडे आणि सौंदर्य पाहून पार्टनरचा रोमँटिक मूड तयार होईल. सेक्सी कपडे परिधान केल्यानंतर पार्टनरनं आपलं कौतुक करावं अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. यामुळे तुमची पत्नी खूश देखील होईल आणि रोमँटिक वातावरणही तयार होईल. ही तुमच्या लैंगिक जीवनाची उत्तम सुरुवात असेल.
2) स्वच्छतेची विशेष काळजी घ्या
सेक्स करण्यापूर्वी तसंच केल्यानंतर आपले गुप्तांग स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. लैंगिक संबंधादरम्यान स्वच्छता राखणे अतिशय महत्त्वाचं असते. या बाबतीत कोणीही एका व्यक्तीने दुर्लक्ष केल्यास गुप्तांगामध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते. ज्यामुळे भविष्यात गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच शरीरासह गुप्तांगाची स्वच्छता राखावी. हे आपल्या लैंगिक जीवनासाठी देखील चांगले असते.
3) घाईघाईत सेक्स करू नका
सेक्स करण्यासाठी घाईघाई करू नका. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. सेक्स करण्यासाठी जोडीदाराची सहमती आहे की नाही, याचाही विचार करा. दोघांचीही सेक्स करण्याची इच्छा असेल तरच तुम्हाला लैंगिक संबंधांद्वारे आनंद मिळू शकतो. सेक्स केवळ शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी नव्हे तर एकमेकांशी भावनिकरित्या जोडले जाण्यासाठीही गरजेचं असते. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास तुमच्यातील नाते सुद्धा मजबूत राहण्यास मदत मिळेल.
4) लुब्रिकेंट आणि कंडोमचा वापर करा
लग्नानंतर पहिल्यांदा सेक्स करण्यापूर्वी महिलांच्या मनात किंचितशी भीती असते. यामुळे योनीमार्ग कोरडा होण्याची शक्यता असते. पण सेक्स करण्यासाठी योनीमध्ये नैसर्गिक स्वरुपात चिकट पदार्थ तयार होणं गरजेचं असते. पण असे न झाल्यास सेक्स करण्यासाठी लुब्रिकेंटचा वापर करावा. तसंच गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचाही उपयोग करावा. याद्वारे आपला पहिला लैंगिक अनुभव आपल्यासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी चांगला असेल.
5) वर्जिनिटीबद्दल चर्चा नको
लग्नापूर्वी सेक्स करणं किंवा न करणं ही खासगी बाब आहे. अशा परिस्थितीत जोडीदाराच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे काम करू नये. आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षणांचा आनंद घ्या आणि सेक्सवर लक्ष केंद्रित करा. आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात व्यापक विचारांद्वारे तसंच मोकळ्या मनाने करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा