ब्रेकअप नंतर MOVE ON कसे करावे
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी स्पेशल व्यक्ती असतो. तो व्यक्ती आपल्यासाठी खूप प्रिय असतो.परंतु काही कारणामुळे ती व्यक्ती आपल्यापासून दूर जातो. त्यामुळे आपल्या मनाला त्याचा त्रास सतत होत राहतो. जुन्या गोष्टी आठवतात, मनामध्ये तेच ते विचार चालत राहतात.तो व्यक्ती आयुष्यात पुन्हा वापस येईल या प्रकारचे विचार देखील आपल्या मनात येत राहतात. मनाला होणाऱ्या या त्रासापासून आपल्याला कशाप्रकारे बाहेर निघता येईल आपण आपल्या आयुष्य आनंदी आनंदी होऊन जगता येण्यासाठी काही काय टिप्स मी सांगणार आहे.
आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात. त्या गोष्टींपासून स्वतःला सावरणे खूप आवश्यक असते.
1] स्वतःवर लक्ष केंद्रीत करा.
MOVE ON होण्यासाठी स्वतःवरती लक्ष केंद्रित करणे खूप आवश्यक आहे.आपल्याला कोणते काम करण्यात जास्त रस आहे ते काम करा.
a) मनामध्ये सारखे तेच विचार येत असतील तर त्या विचारणा पॉसिटीव्ह विचारांनी मात करा.
b) वर्क लिस्ट बनवा दिवस भर स्वतःला कामात busy ठेवा.
c) EMOTIONAL SONGS पासून दुर राहा.
d) स्वतःला भविष्यात कुठे पाहता त्याचा विचार करा.
2] नवीन मित्र मैत्रिणी बनवा.
आयुष्यात जुन्या गोष्टी विसरण्यासाठी सतत नवीन काही तरी करने जरुरी असते.नवीन लोकांना भेटने,
त्याचा सोबत बोलने, त्यांना समजुन घेणे MOVE ON होण्यासाठी फायद्याचे ठरते.
जुने मित्र मैत्रणी आहेत त्यांचा सोबत बोला त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे ते पहा.
3] कामावर लक्ष केंद्रीत करा.
तुम्ही जे काही काम करत आहात त्या वर पुर्ण लक्ष केंद्रीत करा. मनात येणाऱ्या विचारांना दुर करुन स्वतःचे काम कसे focus ने पूर्ण करता येईल यावर लक्ष राहू दया.
कामाची WEEKLY, MONTHLY लिस्ट बनवा.
पेंडिंग कामाची लिस्ट बनवा.
नवीन GOAL SEAT करा.
4] मेडिटेशन करा.
ध्यान जेवढे एकाग्र होऊन कराल तेवढे मनाचे दुःख कमी कमी होत जाईल.
स्वतःचा आत्मविश्वास वाढेल.
मनसोबत डील कसे करायचे कळेल.
परिस्थिती कशी ही असली तरी मन शांत कसे ठेवायचे हे ध्यान धारणेतून लक्षात येईल.
आयुष्य खूप सुंदर आहे ते आपल्याला कळेल.
अनुलोम विलोम करा त्या मुळे ऑक्सिजन लेवल व्यवस्थित राहील.नेगेटिव्ह विचार कमी येतील.
5] माफ करा.
स्वतःला आणि आपल्याला ज्यांनी दुःख दिले आहे त्यांना मनातून माफ करा.त्यांचा कडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. पुढे चला. आयुष्यात खूप काही करायचे आहे स्वतःला सांगा. आयुष्यातून निघून गेलेल्याची वाट पाहू नका. येण्याचे स्वागत करा. आनंदी कसे राहता येईल ते पाहा.
6] पोषक आहार खा.
शरीरासाठी जे पोषक असते तो आहार खा.मनात चांगले विचार येतील. फास्टफूड पासून दुर राहा.
स्वतःची दिनचर्या ठरवा त्या प्रमाणे वागा.
ब्रेकअप नंतर सर्वात महत्वाचे म्हणजे मनाचा निश्चय MOVE ON करायचा. तो असेल तर तुम्हाला रस्ते आपोआप मिळतं जातील. वरी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही FOLLOW करुन स्वतःच्या स्वतः MOVE ON करू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा