अदानी समूहाला झालेल्या नुकसानी मुळे मोठया प्रमाणावर भागधारकांचे नुकसान झाले आहे.भांगधारकांनी मोठया प्रमाणावर अदानी समूहात पैसे गुंतवले आहेत. Hindenburg Research च्या रिपोर्ट नुसार अदानी समूहात मोठ्या प्रमाणावर घोळ आहे.रिपोर्टची सत्यता भविष्यात कळेल.परंतु सध्याच्या स्थितीत शेयर चे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. आणि ही घसरण सतत चालू आहे त्या मुळे ज्यांनी शेयर घेतले आहेत त्यांची चिंता वाढत आहे.
अदानी एंटरप्राइजेज च्या एका शेयरची किंमत रुपये ३३००/- होती ती शुक्रवारी दिनांक ०३ रोजी १०००/- रुपये एवढ्या खालच्या लो लेवल ला आली होती त्या मुळे
ज्या व्यक्तीने रुपये १००००००/- ( दहा लाख) रुपयेचे शेयर घेतले आहेत अदानी एंटरप्राइजेजचे त्याची किंमत ३०३०००/- (तीन लाख तीन हजार) इतकी कमी झाली आहे. हे नुकसान ९ दिवसात झाले आहे.
एल आय सी ची अदानी समूहात गुंतवणूक २८४००/- करोड रुपयांची गुंतवूणक आहे.त्या गुंतवणुकीचे मार्केट मूल्य ७२,२०० करोड रुपये होते Hindenburg Research चा रिपोर्ट आल्या नंतर मार्केट मूल्य ५५७००/- करोड झाले आहे. म्हणजे आता पण एल आय सी २७,३००/- करोड रुपयांच्या नफ्यात आहे.
एल आय सी ची गुंतवणूक विविध क्षेत्रात आहे. एल आय सी टोटल संपत्ती ( LIC TOTAL ASSET ) ४१. ६६ लाख करोड रुपयांची आहे. अदानी ग्रुप मध्ये १% च्या खाली गुंतवणूक आहे त्या मुळे पॉलीसी होल्डर्सना कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही त्यांचा पैसे सुरक्षित आहेत व त्यांना जो मोबदला निश्चित केला आहे पॉलीसीचा तो त्यांना निश्चत वेळेत मिळेल.कोणत्या ही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. असे इन्शुरन्स एक्स्पर्ट लोकांचे म्हणणे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा