नवरा बायको मध्ये दुरावा येत असेल तर करा हे पाच उपाय निश्चित फायदा होईल
कोणताही नात्यांमध्ये छोटे-मोठे भांडण होणे साहजिक असतं मन दुखावलं जाऊ शकत परंतु ते दुखावले गेलेले मन समोरच्या व्यक्तीच्या जर लक्षात येत नसेल तर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.नवरा बायकोचे नाते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखे नसते ते सोबत राहत असतात. त्यामुळे एकमेकांच्या सवयी समजून घेणे व त्याप्रमाणे स्वतःला ऍडजेस्ट करणे आवश्यक असते जर तसे करता नाही आले तर स्वतःच्या मनाला त्रास व समोरच्या व्यक्ती पासून आपण दुरावल्या जाऊ शकतो.
1] एकमेकांना समजून घेणे
नवरा बायकोने एकमेकांना समजून घेणे एकमेकांच्या सवयी समजून घेणे आवश्यक असते जर सवयी समजून घेतल्याला तर वाद होणार नाहीत नात्यात मधुरता राहील नाते मजबूत होईल. नवरा बायको मध्ये समजूतदारपणा असेल तर संवाद होईल विविध विषयावर चर्चा होईल.
2] मन दुखावेल अशी कृती न करणे
नवरा बायकोचा सहवास हा सोबत असतो कधी भांडण होईल त्या वेळी मन दुखावेल असे काही बोलू नये किंवा मानला त्रास होईल अशी कृती करू नये. स्वतःच्या शब्दावर नियंत्रण असले पाहिजे. भांडण किंवा वाद हा काही काळापुरता आसू शकतो परंतु बोलले शब्द मनाला घाव करून जातात तर ते आपण काळजी पूर्वक वापरले पाहिजे.
3] मनामध्ये राग न धरणे
मन हे खूप चंचल असते जे विसरायचे असते लक्षात ठेवते आणि जे लक्षात ठेवायचे असते ते विसरते म्हणून आपण मन मध्ये कुठल्याही गोष्टीला घर करू देता कामा नये. नवरा बायको म्हंटले की वादविवाद आला, भांडण आले या सर्व गोष्टी काही काळापुरत्या असतात त्यांना मनामध्ये ठेवू नये त्या मुळे नात्यात दुरावा येऊ शकतो एखादी गोस्ट जर मनाला पटत नसेल तर ती नवऱ्यला सांगावी किंवा बायकोला सांगावी मनामध्ये ठेवू नये.
4] सपोर्ट सिस्टिम बनने
नवरा बायको एकमेकांनी दोघांचे सपोर्ट सिस्टिम बनले पाहिजे. कोणताही निर्णय घेतला चर्चा केली पाहिजे आणि आपल्या काय सपोर्ट करता येईल ते पाहिले पाहिजे विरोध न करता पार्टनरला गोष्टी समजून सांगता आल्या पाहिजे. जिथे आपली गरज असेल तिथे सपोर्ट बनून राहिले पाहिजे. आर्थिक निर्णय घेताना चर्चा केली पाहिजे.
5] आदर करणे
नवरा बायको मध्ये एकमेकान विषयी आदर असला पाहिजे तो जर नसेल तर नाते चांगल्या प्रकारे चालू शकणार नाही.नवरा बायको मध्ये आदर असेल तरच प्रेम वाढेल. जिथे आदर असतो तिथे प्रेम असते. कधी ही आपल्या पार्टनरचा अपमान होईल अशी कृती करू नये. त्यामुळे तुमच्या बदल त्या व्यक्तीच्या मनातील आदर कमी होऊ शकतो. नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा