पत्नीच्या निधना नंतर पती खाते बंद करायला गेला आणि .....
परिवारातील व्यक्ती अचानक गेला तर परिवार तुटून जातो आणि जाणारी व्यक्ती जर स्त्री असेल तर दुःख शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. स्त्री गृहिणी असो वा नोकरी करणारी पूर्ण घर ती चालवत असते. पत्नी,आई,सुन्न हे सर्व पात्र ती अत्यंत सहज पणे करत असते कि तिच्या नसण्याने सगळं काही थांबून जाते. अशीच चिंता सोलापूरच्या रविंद्र गायकवाडला लागली होती संसार एकट्याला चालवायचा होता पत्नीच्या अचानक जाण्याने ते खूप चिंतेत होते. तीन मुली एक मुलगा असे चार अपत्याचा सांभाळ कार्याची जीमेदारी आता रवींद्र गायकवाड वर आली होती.
आर्थिक स्थिती व्यवस्तित नसल्याने आणि पत्नीचे खाते बंद करून थोडी रकम असेल तर ती कामी येईल या विचारने SBI BANK मधील खाते बंद करण्यासाठी रविंद्र बँकेत गेले मॅनेजरला पत्नीच्या निधाना बदल सांगितले. खाते बंद करत असताना बँकेतील अधिकाऱ्याने खाते बुक चेक केले त्यात त्यांना खात्यातून ४३६ रुपये पंतप्रधान जीवन योजने साठी वजा झालेले निदर्शनास आले. त्यांनी ती माहिती मॅनेजरला व रवींद्रला सांगितली.
बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन लाख रुपये मिळणार आहेत पंतप्रधान जीवन योजनेचे त्या वेळी रवींद्रच्या डोळ्यांतून आश्रू अनावर झाले. पत्नीने जाताना ही आपले कर्तव्य निभावले अशी भावना रवींद्रची होती.
मुलींच्या नावे दोन लाख रुपयांचे fixed deposit केले. भविष्यात शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी हे पैसे कामी येतील या विचारणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा